परिस्थिती
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar
मी चालत होतो वाटेवरूनी
पावलांना ठेच लागली
मनाने ही उत्तर दिले पुढे बघ वाटेवरी
पुढे बघताच अंधूक सारे दिसू लागले
तोंड ही विचारू लागले योग्य वाट कोणती बरे
लोकांनी उत्तर दिले वाट तुझी तूच शोध बरे
डोळ्यांनी शोधुनी वाट काढली पावलांनी झेप घेतली त्या वाटेवरी
वाट सारी काट्याने भरलेली सहन मात्र पावलांनी केलेली
पावले पुढे चालत राहीली
डोळ्यातून मात्र अश्रु खाली गळत राहिले
त्या अश्रूंची किंमत फक्त डोळ्यांना च माहिती
विरह काय असतो फक्त त्या अश्रुंनाच माहिती
वेगळे झाले अश्रु त्या डोळ्यांपासूनी
सहारा मिळाला त्यांना त्या हातांपासूनी
हातांनी त्यांना अलगद पणे झेलून घेतले
परिस्थिती समजावून सांगून पुसून टाकले
अश्रूंनी ती परिस्थिती समजून घेतली
आणि स्वतःचे अस्तित्व मिटवून टाकले
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar



Comments