अस्तित्वाची हजार नावे
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Ashwini Gayake Mozar
आकाशाच्या छत्रीखाली भिजताना
रणामधील उन्हात भावनांना कुरवळताना,
या हसण्याचे कारण उमगेल का
खरंच याला हसणे म्हणवेल का ?
शब्दांचे हे वळसे झेलताना
प्रश्नांचे एकसंधसे तुकडे जोडताना,
आशेची ज्योत गवसेल का
याला आशावादी असणं म्हणवेल का ?
तुफानातील होड्या सावरताना
मनातील अबलख घोडे नाचताना,
घोड्यांना लगाम मिळेल का
या लगामाने हे सावरेल अस म्हणवेल का ?
प्रवास खडतर चालताना
वाट आंधळी ओलांडताना,
शब्दांची काठी हाती लागेल का
या अस्तित्वाची हजार नावे अस म्हणवेल का ?
By Ashwini Gayake Mozar



Comments