जीवन - एक झुंज
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Ashwini Gayake Mozar
मोत्याने अपेक्षा केली का कधी,
शिंपल्या कडून आधाराची ?
ना किनाऱ्याने तमा बाळगली
कधी समुद्राच्या पाण्याची !
कधी वाऱ्याने संगत धरली का
रिमझिमनाऱ्या सरींची ?
ना जमिनीने कधी प्रतीक्षा केली
आभाळाच्या अथांग सावलीची !
इतिहास वाट पाहतो का कधी
अवर्णनीय कथेची ?
जीवनरुपी रणामधे ही फुटते
हळवी पालवी भावनांची !
अशीच झुंज आहे ही
आपल्या स्वतःच्याच जीवनाची,
स्वतः एकट्यानेच लढून
असते ती जिंकायची !
By Ashwini Gayake Mozar



Comments