नारी - एक शक्ती
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Ashwini Gayake Mozar
या विश्वाला आभाळासम
तुझी अथांग सावली लाभू दे,
अवर्णनीय समर्पण अन् झुंज देताना
स्रीत्वाच अस्तित्व टिकू दे.
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासू दे,
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व हे सारे वसू दे.
तुझ्या उदात्त प्रयत्नांना
यशाचे सोनेरी तोरण लाभू दे,
लक्ष लक्ष दिव्यांनी
तुझे कर्तृत्व उजळू दे.
तू मायेचं शिंपण, मांगल्याचे औक्षण
चंदनापरी तुझं सामर्थ्य दरवळू दे,
तू अबला नाही, धगधगता अंगार आहे
क्षितिजावर तुझे लोभस सूर्यकिरण पसरू दे.
तुझ्या कर्तृत्वाला आणि सामर्थ्याला
यशाची नवी झालर येऊ दे,
तुझ्या उत्तुंग भरारीने
स्री शक्तीचा पुन्हा जागर होऊ दे.
By Ashwini Gayake Mozar



Comments