वय
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar
वय ही अशी गोष्ट आहे जी कायम स्वरुपी वाढत च असते
किती ही रोखून धरायच म्हणलं तरीही माती सारखी हातातून निसटून जात च असते
मातीला हातात पकडायचे असेल तर माती ओली करावी लागते तर जाऊन मातीचा गोळा हातात राहतो
तसेच वयाला हातात पकडायचे असेल तर वयाला आठवणींनी ओले करावे लागते तर जाऊन गेलेलं वय कायम लक्ष्यात राहत
मातीची सुद्धा मशागत करावी लागते तेव्हा जाऊन कुट पीक चांगल येत
तसच वयाची सुद्धा चांगल्या संस्काराने मशागत करावी लागते तेव्हा जाऊन कुट चांगला माणूस होतो
काही विशिष्ट वेळेत पिकांची कापणी केली जाते आणि त्यानंतर च नवीन पिकांची लागवड केली जाते
तसेच काही विशिष्ट वयात आपल्यातल्या गर्विष्ठ पणांची कापणी करून समजूतदारपणा ची लागवड करावी लागते
पिकाला योग्य वेळेत योग्य ते पोषण दिल तर पीक ही छान डौलु लागत
तसच योग्य वयात भेटलेले आठवणी योग्य संस्कार चूक बरोबरी ची समज भेटली की आहे ते वय सुद्धा आनंदाने डौलु लागत ..
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar



Comments