आयुष्याचं गणित
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar
आयुष्याच्या गणितात संख्याची ना बेरीज ना वजाबाकी ना गुणाकार ना भागाकार केला जातो.
आयुष्याच्या गणितात मूल्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार केला जातो
आयुष्याच्या गणिताचा आराखडा रेखने म्हणजे आपल्या मूल्यांकडे बघणे
आयुष्याच्या गणितात ना संख्याची मोजणी केली जाते
तर आयुष्याच्या गणितात आपल्या कर्तव्याची ,प्रतिष्ठांची, जबाबदारीची, वागणुकीचे मूल्यांकन
केले जाते
आयुष्याच्या गणिताची संकल्पना पुस्तकाच्या गणितासोबत जोडली जाते
पुस्तकातील गणित म्हणजे कोणत्यातरी दोन संख्यांसोबत केलेली एक विशिष्ट प्रक्रिया
तसेच आयुष्यातील गणित म्हणजे सुद्धा दोन राशीमध्ये केली जाणारी एक विशिष्ट प्रक्रियाच
आहे फक्त ती प्रक्रिया भावनिक ,वैचारिक पद्धतीने केली जाते
पुस्तकातील गणितात जसे आकडेमोड बघितले जातात
तसेच आयुष्याच्या गणितात व्यक्तीच्या आयुष्यात आलेले उतार,चढाव बघितले जातात
एका बाजूने आयुष्याचं गणित बरोबर पुस्तकाचं गणित असं वाटतं
का तर दोन्ही गणितामध्ये शेवटी एक विशिष्ट उत्तर भेटतं
परंतु दुसऱ्या बाजूने आयुष्याचे गणित पुस्तकाच्या गणिता बरोबर नाही असं वाटतं
का तर पुस्तकातील गणित हे एका पुस्तकाशी/ वहीशी निगडित असतं परंतु आयुष्याचं गणित हे
एखाद्याच्या आयुष्याची निगडित असतं
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar



Comments