एका मुक्या जीवाची कहाणी
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 3 min read
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar
एका मुक्या जीवाची कहाणी जी आज विलुप्त होत चालली आहे
ती चिमणी !!!
दोन मित्र वडाच्या झाडाखाली कट्यावर बसून गप्पा मारत असतात
तेच गप्पा जे दैनंदिन आयुष्याच्या
एक हरी जो भावनिक आणि दुसरा राॅनी जो व्यावहारिक
तितक्यात एक चिमणी च पिल्लू त्यांच्या समोर जखमी अवस्थेत पडलेलं त्यांना दिसत
हरी :- अरे चिमणी च पिल्लू जखमी दिसतय
राॅनी :- असुदे ना आपणाला काय करायचय
हरी :- अरे असं का बोलतोय त्या पिल्ल्याची अवस्था तरी बघ ना
राॅनी :- जाऊदे ना आपल्याकडे कुठं एवढा वेळ आहे जे याची काळजी करत बसू आपण
हरी :- आपण असं पण गप्पा च मारत बसलोय ना
राॅनी :- तुला हवं ते तू कर मला यामध्ये नाही पडायचं
तितक्यात त्या पिल्लाची आई तिथे येते तिला हे दिसत असत की समोर दोन वेक्ती बसलेले आहेत आणी त्यांच्या समोरच माझं पिल्लू या अवस्थेत पडलं आहे तरी हे असेच कस काय बसू शकतात
मग ते चिमणी तिच्या पिल्ल्याला बोलते
अरे बाळा तू यांच्या अपेक्ष्यांवर इथ पडलास हे खरं आहे पण हे लोक तुला नाही वाचवणार
यांनी गच्ची वर वाळत घातलेल्या धान्याला आपण च टिपतो ना म्हणुन कदाचित राग असेल यांचा
यांनी वाळत घातलेल्या कपड्यावर आपणच घान करतो ना म्हणुन कदाचित राग असेल यांचा
यांच शांतपूर्वक असलेल आयुष्य आपल्या किलबिलाटा मुळे अशांत होत असेल ना म्हणुन कदाचित राग असेल यांचा
आपल्या मुळे च तर यांच्या आयुष्यात सर्व संकटं आहेत ना
म्हणुन कदाचित राग असेल यांचा
पण कदाचित यांना विसर पडला असेल याचा
आपल्या किलबिलाटाने लहान लेकरू आनंदाने उड्या मारत असत वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू येत घर अगदी भरून गेल्या सारखं वाटत हे कदाचित माहिती नसेल यांना
बरी होती ते जुनी माणसं ज्यांना या नवीन दुनियेचा काही संबंध नव्हता नाहीतर आपली पिढी कधीच नाहीशी झाली असती
बाळा ते जुन्या विचारांची माणसं आपल्या साठी अंगणात दाणे टाकून ठेवायचे आपण त्यांच्या घरात यावं ते दाणे टीपावे आणि त्यांचं घर आनंदाने बहरून जावे म्हणून
नाहीतर या पिढी न तर आपल अस्तित्व च नाकारलं आहे
आपली पिढी संपुष्टात येण्या मागे याच लोकांचा तर मोलाचं वाटा आहे
यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे च तर आपले घर आता पक्क्या विटांचे झालेत
यांच्या असल्या आयुष्यामध्ये च आपण आपल अस्तित्व गमावलोय
आपण आपल्या मेहनतीनं बनवलेलं घरटं हे लोक त्यांच्या घराच्या शु-शोभिकरणासाठी वापरतात तेंव्हा त्यांना दया नाही आली तर आज तरी का येणार
आपण आपल पोट भरण्यासाठी निसर्गात असलेली फळ धान्य खातो हे पण यांना सहन होत नाही हे त्याचं वेळेत दगड फेकून मोठे आवाज करून आपल्याला पळवून लावतात
यांना आपल जीवंत अस्तित्व च नको आहे या लोकांना फक्त आपले नकली पुतळे हवे आहेत शु-शोभिकरणासाठी
इतक्या साऱ्या गोष्टी करते वेळेस यांना आपल विचार नाही आला तर आज तरी आपला का विचार करतील
यांना आपल महत्त्व आज नाही समजणार
जेव्हा आपली प्रजाती संपुष्टात येईल आणि आपली जागा भ्रमणध्वनी (mobile) घेईल तेव्हा यांना आपली आठवण येईल आणि आपल महत्त्व समजेल
यांना त्या वेळेस समजेल की आधुनिक काळापेक्षा पूर्व काळ च बरा होता ते
इतकं करून ही आपली प्रतिमा यांच्या नजरेत शून्य च
त्यापेक्षा तु तुझा जीव कोणत्या ही अपेक्षा न ठेवता सोड
इतकं बोलून ते चिमणी तिच्या डोळ्यातले अश्रु खाली पडू न देता तिथून निघून जाते
त्या दोघांना पण त्यांची चूक जाणवते आणि त्यांचे ही डोळे पाणावलेले असतात
हरी :- रॉनी खरंच रे आपण कळत नकळत इतक्या चुका केलोय याची आपल्या जाण पण नव्हती
रॉनी :- बरोबर बोललास तू आपण सुद्धा निसर्गाचं काहीतरी देणं लागतोच ना तरीही आपण या कडे दुर्लक्ष केलं या गोष्टीचं वाईट वाटत आहे आता
नंतर ते दोघं त्या पिल्लाला योग्य ते उपचार करवून परत सोडून देतात
हरी :- आता कसं मनाला एक वेगळाच आनंद होत आहे रे
रॉनी:- आपण एका मुक्या जीवाचा जीव वाचवला ना म्हणुन !!
तात्पर्य:- मुक्या जीवाचे रक्षण करणं हाच आपला धर्म
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar



Comments