कळी = यश
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar
एक बियाण असत ज्याला मातीत लावलं की वृक्ष होत,
त्या वृक्षाची काळजी घेतली की ते मोठं होत
आणि मोठं झालं की कळी लागते
आणि तेच कळी नंतर फुला मधे रूपांतरित होते
एवढं सोपं आहे ना हे 😁
पण जर थोड आत मधे जाऊन विचार केला तर खरच एवढं सोप आहे का हे
एक बियाण घेते वेळेस पण त्या बियाण्याची उगविण्याची क्षमता आहे का नाही हे पण बघितल जातच ना
नंतर त्याला ज्या मातीत लावायच आहे त्याची योग्यता पण बघितल जातच ना
नंतर बियाण्याची लागवड केल्यावर त्याला योग्य तेवढं खत पाणी करावं च लागत ना
एवढं करून ही त्याची पूर्ण वाढ होई पर्यंत वाट बघावी लागतेच ना
तेव्हा कुठं जाऊन कळी येते आणि मग फुल होत ना
मग आपण माणसाला का यश लवकर भेटण्याची घाई असते
जर साध्या बिया ल पण फुल होण्यासाठी खूप काही गोष्टी ल तोंड द्यावच लागत ना
मग आपणाला एवढ्या सोप्या पद्धतीनं यश मिळेल का ?
आपल्या पण ज्ञानाची चाचणी केली जाईल च ना मग जाऊन कुठ यश भेटेल
आपल्या हातात एवढच असत की त्या चाचणी मधे यशस्वी रित्या उतरून पुढं जाणं जस फुलाच बियाण गेलं
योग्य त्या वेळेत योग्य ते सर्व नक्की भेटतं
By Mahadev Virbhadreshwar Kumbhar



Comments